पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावसाहेब दानवे... मराठवाड्याच्या मातीशी नाळ जोडलेला नेता..!

'मी जालन्याच्या शाळेत जातो' हा रुस्तम अचलखांब यांचा धडा माझ्या बऱ्याच पुढच्या इयत्तेला होता. माझ्यापर्यंत येईपर्यंत दोनदा सिल्याबस बदलला. धड्यात वर्णन केलेल्या गावाचं वर्णन हे रूढार्थाने जालन्याच्या प्रत्येक गावखेड्याचं वर्णन होतं.  पहिल्या इयत्तेपासून गाव सोडून विदर्भातल्या शहरात शिकायला गेलो. पण माझ्या मराठवाडा प्रांतांबद्दलची नाळ तोडणं शक्य झालं नाही. पुस्तकात माझ्या जालना  जिल्ह्याचा उल्लेख आणि माझ्या गावासारखं हुबेहूब वर्णन असलेला मजकूर पुस्तकात अभ्यासाला येण्याची ती एकमेव घटना होती. त्याआधीही आणि त्यानंतरही आमची गावकी मांडण्याचा कोणत्याही छापील  दस्ताऐवजात प्रयत्न झाला नाही.  त्या धड्यात वर्णन केलेलं गाव आणि गावाची रचना. गावाबाहेरचं मारुतीचं आणि देवीचं देऊळ आणि पाटलाच्या पडक्या वाड्यापासून ते मांगवाड्यातलं गंग्या मांगाचं झोपडं ही अशी हुबेहूब रचना त्या काळात रुस्तम अचलखांब यांनी चितारली. इतर प्रदेशातली भौतिक परिस्थिती झपाट्याने बदलून तिथल्या साहित्याला इतिहास ठरवत गेली. पण मी वाचलेला जालन्याच्या शाळेत जातो हा धडा आताआतपर्यंत माझ्या जिल्ह्याच्या भूगोलाशी दुर्दैवा...