पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवड्याची शोकांतिका: तिथं जन्माला नं आलेला एकही कर्मवीर भाऊराव पाटील

आमच्या मारठवाड्यातही ढिगाने पाटील झालेत. निजामशाहीतही आमच्या गढ्या अन वाडे शाबूत राहिले. पण कुणी भाऊराव पाटील निपजला नाही. ही आमची क्रूर शोकांतिका आहे.  वेरूळ अजिंठ्यासारख्या कलाकृती असो की इतर कोणताही पुरातन ठेवा त्याच्या नखाचीही सर कुठल्याही राजवटीला, संस्कृतीला नाही. मराठी संस्कृतीचा इतिहास मारठवाड्याभोवतीच घुटमळतो. इतर महाराष्ट्र हा त्या संस्कृतीभोवतीचं प्रभावीत क्षेत्र आहे. पण या मराठी संस्कृतीला शाप आहे. इथं आसऱ्याला आलेला प्रत्येकजण मोठा होतो. अन त्याच वेगात या संस्कृतीची कूस वांझोटी होत जाते.  मारठवाड्यातले भग्न वाडे आणि चिरेबंदी गढ्या पहिल्या तरी इतर इथल्या मराठी संस्कृतीचा वैभवशाली इतिहास तुम्हाला दिसेल. पण हे सगळे भग्नावशेष आज त्या संस्कृतीच्या कर्तृत्ववान पिढ्यांबाबतच्या वांझोटेपणाची कबुली आहे. आम्हीही पाहिलेत कित्येक जरीपटका बांधलेले अक्कडबाज पाटील, त्यांच्या तिवसाच्या दमनीला पितळाचा मुलामा आणि तिला जुंपलेले तालीमबंध कदम चालीत चालणारे रंगी-शिंगी हरणचनी बैल. पांढऱ्याशिपित आडदंड घोड्यांच्या नक्षीदार कातडी जिनांवर  मांड ठोकून हातात रेशमी लगाम धरून फेरफटका मारणार...