पोस्ट्स

मराठवड्याची शोकांतिका: तिथं जन्माला नं आलेला एकही कर्मवीर भाऊराव पाटील

आमच्या मारठवाड्यातही ढिगाने पाटील झालेत. निजामशाहीतही आमच्या गढ्या अन वाडे शाबूत राहिले. पण कुणी भाऊराव पाटील निपजला नाही. ही आमची क्रूर शोकांतिका आहे.  वेरूळ अजिंठ्यासारख्या कलाकृती असो की इतर कोणताही पुरातन ठेवा त्याच्या नखाचीही सर कुठल्याही राजवटीला, संस्कृतीला नाही. मराठी संस्कृतीचा इतिहास मारठवाड्याभोवतीच घुटमळतो. इतर महाराष्ट्र हा त्या संस्कृतीभोवतीचं प्रभावीत क्षेत्र आहे. पण या मराठी संस्कृतीला शाप आहे. इथं आसऱ्याला आलेला प्रत्येकजण मोठा होतो. अन त्याच वेगात या संस्कृतीची कूस वांझोटी होत जाते.  मारठवाड्यातले भग्न वाडे आणि चिरेबंदी गढ्या पहिल्या तरी इतर इथल्या मराठी संस्कृतीचा वैभवशाली इतिहास तुम्हाला दिसेल. पण हे सगळे भग्नावशेष आज त्या संस्कृतीच्या कर्तृत्ववान पिढ्यांबाबतच्या वांझोटेपणाची कबुली आहे. आम्हीही पाहिलेत कित्येक जरीपटका बांधलेले अक्कडबाज पाटील, त्यांच्या तिवसाच्या दमनीला पितळाचा मुलामा आणि तिला जुंपलेले तालीमबंध कदम चालीत चालणारे रंगी-शिंगी हरणचनी बैल. पांढऱ्याशिपित आडदंड घोड्यांच्या नक्षीदार कातडी जिनांवर  मांड ठोकून हातात रेशमी लगाम धरून फेरफटका मारणार...

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं....

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं.... गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत. आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारावाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले.  आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळ लागली असेल. आम्ही त्याच्या बदल्यात माणशी शेरभर ज्वारी दिली आणि मोकळे झालो. आजपर्यंत शाबूत असलेल्या आमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे, छपराचे महारावाडे पाहत आलो. आता आता म...

महात्मा फुल्यांच्या विचारांचं सामजिक उपयोजन

#महात्मा_फुले_जयंती #बहुजन_स्त्रिया #ढोंगी_शुभेच्छूक              वर्तमानपत्रात महिलांचे कर्तृत्व व प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी खास महिला विशेष पुरवण्या असतात. मी त्या पुरवण्या जरूर वाचतो. त्यात विशेष गोखले, परांजपे, लिमये,  भिडे आणि तत्सम बिरादरी असलेली आडनावे वाचायला मिळतात. आणि पुढं कंसात अमेरिकेहून, लंडनवरून, ऑस्ट्रेलियाहून आशा देशातील त्यांचा पत्ता दिलेला असतो. अशा पुरवण्या वाचताना माझं त्या अडनावांवर आणि देशांवर बारीक लक्ष असतं. का कुणास ठाऊक मला त्या नावांमध्ये काहीतरी वेगळं अपेक्षित असतं. पण माझा नेहमीच हिरमोड होतो.  फुले जयंतीच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये वरील आडनावे असलेल्यांच्या भावकीतलं किंवा नात्यातलं फारसं कोणीच आढळून येत नाही. आणि असलं तरी त्यांनीच त्या शुभेच्छा देणं खरं अभिवादन ठरेल. बाकी बहुजनांची फक्त औपचारिकता आहे. ढोंग आहे.  कारण महात्मा फुलेंचं समग्र साहित्य आणि विचार वाचल्यास असं लक्षात येतं की त्यांनी वरील आडनावे असलेल्या वर्गाने राबवलेल्या कर्मठ विचारांना लक्ष्य केलं होतं.  पण परिस्थितीचा विरोधाभास बघा. आज ...

कट्टरवाद्यांना उरून पुरलेले फुले

महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं. कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती.  पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती. आणि आज आपल्याला लघुशंकेवेळी कानात जानवं गुतवण्याचे वैज्ञानीक फायदे सांगत फिरावं लागलं असतं.  आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत. प्रत्येक समाजाची अन्यायी पुरोहितशाहीतून सुटका झाली आहे. तरीसुद्धा फुलेंच्या विचारांचं वावडं असणं ही केवळ विकृती आहे. कारण विकृतीला नेहमी विवेकाचं वावडं असतं.  गांधीवादाचा अवाजवी हट्ट धरणाऱ्यांसाठी सांगायचं झालं तर फुलेंना उशीखाली दांडपट्टा बाळगण्याची गरज प...

रावसाहेब दानवे... मराठवाड्याच्या मातीशी नाळ जोडलेला नेता..!

'मी जालन्याच्या शाळेत जातो' हा रुस्तम अचलखांब यांचा धडा माझ्या बऱ्याच पुढच्या इयत्तेला होता. माझ्यापर्यंत येईपर्यंत दोनदा सिल्याबस बदलला. धड्यात वर्णन केलेल्या गावाचं वर्णन हे रूढार्थाने जालन्याच्या प्रत्येक गावखेड्याचं वर्णन होतं.  पहिल्या इयत्तेपासून गाव सोडून विदर्भातल्या शहरात शिकायला गेलो. पण माझ्या मराठवाडा प्रांतांबद्दलची नाळ तोडणं शक्य झालं नाही. पुस्तकात माझ्या जालना  जिल्ह्याचा उल्लेख आणि माझ्या गावासारखं हुबेहूब वर्णन असलेला मजकूर पुस्तकात अभ्यासाला येण्याची ती एकमेव घटना होती. त्याआधीही आणि त्यानंतरही आमची गावकी मांडण्याचा कोणत्याही छापील  दस्ताऐवजात प्रयत्न झाला नाही.  त्या धड्यात वर्णन केलेलं गाव आणि गावाची रचना. गावाबाहेरचं मारुतीचं आणि देवीचं देऊळ आणि पाटलाच्या पडक्या वाड्यापासून ते मांगवाड्यातलं गंग्या मांगाचं झोपडं ही अशी हुबेहूब रचना त्या काळात रुस्तम अचलखांब यांनी चितारली. इतर प्रदेशातली भौतिक परिस्थिती झपाट्याने बदलून तिथल्या साहित्याला इतिहास ठरवत गेली. पण मी वाचलेला जालन्याच्या शाळेत जातो हा धडा आताआतपर्यंत माझ्या जिल्ह्याच्या भूगोलाशी दुर्दैवा...